Seo Services
Seo Services

युतीची उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित

Image result for युतीची उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित

पिंपरीमावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुस-यावेळी शिवसेनेकडे आहे. मावळावर तिस-यांचा भगवा फडकाविण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचिवल्या. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क झाला आहे. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. पार्थ यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.

  • शिवसेना-भाजप युतीमध्ये मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर मावळात भाजपची ताकद वाढल्याचा दावा करत मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी केली. परंतु, तो असफल ठरला.

  • युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मतदारसंघ कोणाकडे असणार? या वादावर पडला पडला असतानाच भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासाठी थेट शिवसेनेची उमेदवारी घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्यातही यश आले नाही. 'मातोश्री'ने मावळची उमेदवारी श्रीरंग बारणे यांनाच देण्यात येणार असल्याचे स्पष्‍ट केले आहे. येत्या दोन दिवसात खासदार श्रीरंग बारणे यांची अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होईल.


  • एकवीरा देवीचे दर्शन घेऊन खासदार बारणे करणार प्रचाराचा शुभारंभ! 

  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीचे दर्शन घेऊन खासदार श्रीरंग बारणे उद्या (शुक्रवारी) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.


  • युतीची उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित युतीची उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 21, 2019 Rating: 5

    No comments:

    ads 728x90 B
    Powered by Blogger.