नवी दिल्ली : लंडन बुक फेअर मधे इंडिया पॅव्हेलियनचे माहिती आणि प्रसारण सहसचिव विक्रम सहाय आणि प्रकाशन विभागाच्या महासंचालक साधना राऊत यांनी उद्घाटन केले. लंडन ऑलिंपिया येथे 12 ते 14 मार्च या काळात हा पुस्तक मेळा भरला आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीवर, इंडिया पॅव्हेलियनमधे विशेष भर देण्यात आला आहे. ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’ यांची डिजिटल आवृत्ती, संस्कृती, इतिहास आणि भारताचे लोकसाहित्य इंडिया पॅव्हेलियनमधे आहे.
महात्मा गांधींचे जीवन, स्टॅच्यु ऑफ युनिटी यासह भारतातल्या आणखी महत्वाच्या बाबींविषयी संवादात्मक डिजिटल मिडीया अनुभव या पॅव्हेलियनमधे उपलब्ध आहे. ‘मेकींग ऑफ कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी-मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक आवृत्ती’ या विषयावरचे चर्चासत्रही लंडन ऑलिंपियामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
लंडन पुस्तक प्रदर्शनीत भारतीय पुस्तक दालनाचे उद्घाटन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 14, 2019
Rating:
No comments: