Seo Services
Seo Services

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघातून माघार

Image result for मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आनंद तर व्यक्त केलाय त्याचसोबत पवारांवर टीका देखील केली आहे. पवारांची माघार हा शिवसेना-भाजप युतीचा मोठा विजय असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार हे 'हेवचा अंदाज घेतात', असे म्हणाले होते. त्यानुसारच शरद पवार यांनी राजकीय हवेचा अंदाज घेत माघार घेतली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पवारांनी राजकिय हवेचा अंदाज घेतला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. शरद पवार हे हवेचा अंदाज घेतात असे नरेंद्र मोदी नेहमीच म्हणतात. आताही शरद पवार यांनी हा अंदाज घेतला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या देशात मोदींना पाठिंबा देणारे वातावरण आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी हवेचा अंदाज घेतल्याचे मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. तसेच शरद पवार यांची माघार हा भाजप युतीचा विजय असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पराभव दिसला म्हणून माघार घेतली

सुभाष देशमुख यांनी शरद पवार यांना आपल्या समोर पराभव दिसला असेल म्हणूनच त्यांनी माघार घेतल्याची टीका सुभाष देशमुख यांनी केली. शरद पवार यांनी एका महिन्यांपूर्वी माढा लोकसभा लढविण्याची तयारी दाखवत सभा घेतल्या त्यामुळे माढा मतदार संघातील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली होती असे सांगत त्यांनी शरद पवार यांनी उमेदवारी माघार का घेतली हे माहीत नाही पण पवार यांनी माघार घेतल्याने भाजपाचा हा पहिलाच विजय असल्याचे सुभाष देशमुख म्हणालेत. तसेच भाजपला जेव्हा शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी ४८ जागा निवडून येतील असे सांगितले होते. त्यांनी त्यांचा पराभव पकडून ४८ जागा भाजप जिंकेल असे सांगितले असावे, असे मला वाटत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

वरिष्ठ जबाबदारी देतील ती स्वीकारेन

दरम्यान, शरद पवार यांनी माघार घेतल्याने तुमच्या अडचणी कमी झाल्या असे पत्रकारांनी सुभाष देशमुख यांना विचारले असता भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती स्वीकारून जर पक्षाने निवडणूक लढविण्यास सांगितले तर मी निवडणूक लढेन असे सुभाष देशमुख म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघातून माघार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघातून माघार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 12, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.