Seo Services
Seo Services

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम


मुंबई : राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघात ४ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २५ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २६ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०१९ आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ११ एप्रिल २०१९ रोजी होईल. पहिल्या टप्प्यात वर्धारामटेकनागपूरभंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूरचंद्रपूरयवतमाळ-वाशिम या ७ मतदारसंघात मतदान होणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १९ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २६ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २७ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २९ मार्च २०१९ आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होईल. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणाअकोलाअमरावतीहिंगोलीनांदेड,परभणीबीडउस्मानाबादलातूरसोलापूर या १० मतदारसंघात मतदान होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ४ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ५ एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ८ एप्रिल २०१९ आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान २३ एप्रिल २०१९ रोजी होईल. तिसऱ्या टप्प्यात जळगावरावेरजालनाऔरंगाबादरायगडपुणेबारामतीअहमदनगरमाढासांगलीसातारारत्नागिरी-सिंधुदुर्गकोल्हापूर,हातकणंगले या १४ मतदारसंघात मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ९ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १० एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१९ आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान २९ एप्रिल २०१९ रोजी होईल. चौथ्या टप्प्यात नंदूरबारधुळेदिंडोरीनाशिकपालघरभिवंडी,कल्याणठाणेमुंबई उत्तरमुंबई उत्तर-पश्चिममुंबई उत्तर-पूर्वमुंबई उत्तर-मध्यमुंबई दक्षिण-मध्यमुंबई दक्षिणमावळशिरुर आणि शिर्डी या १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. 

सर्व चारही टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी ही २३ मे २०१९ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक  २७ मे २०१९ आहे. 
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 12, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.