पुणे : निवडणूक आयोगाने 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांचे ओळखपत्र हरवलेले आहे तसेच काहींचे नाव मतदार यादीत असते मात्र त्यांच्या हातात अद्याप ओळखपत्र आलेले नाही. अशा लोकांसाठी ओळखपत्र नसताना देखील आता केवळ ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणे शक्य होणार आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील. 2014 च्या तुलनेत यंदा 7 कोटी मतदार वाढले आहेत. अठरा-एकोणीस वर्षांचे दीड कोटी मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करतील. 8 कोटी 43 लाख नवीन मतदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती
— पासपोर्ट
— वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
— छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )
— छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
— पॅनकार्ड
— एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
— मनरेगा कार्यपत्रिका
— कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
— छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
— खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
— आधारकार्ड
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 29, 2019
Rating:
No comments: