नवी दिल्ली : तिकीट कापणं हा मोठा मुद्दा नाही, पण ज्या पद्धतीने हे सर्व करण्यात आलं, ती पद्धत अपमानजनक आहे, अशी प्रतिक्रिया अडवाणींच्या वतीने देण्यात आली.भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं गांधीनगर लोकसभेचं तिकीट कापून भा.ज.पा.अध्यक्ष अमित शहांना त्या जागेवर उमेदवारी देण्यात आलीय.उमेदवारांची यादी निश्चित करण्यापूर्वी रामलाल यांनी ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांना निवृत्तीची घोषणा करण्यास सांगितलं होतं. पण अडवाणी यांनी यासाठी नकार दिला. पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने संपर्क साधला नाही याबाबत अडवाणी नाराज होते, असंही त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी संगितलंय.दरम्यान, सोशल मीडियातही अडवाणींचं तिकीट कापल्याने भा.ज.पा.ला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाव लागत आहे.
तिकीट कापलं त्याचं दुख: नाही, पण….अडवाणींच्या वतीने पहिली प्रतिक्रिया
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 27, 2019
Rating:
No comments: