Seo Services
Seo Services

एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीसाठी 7 एप्रिल रोजी मेळावा



निगडी : प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे एनडीए आणि व एसएसबी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या यावर्षीच्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष वर्ग व प्रशिक्षण घेतले जाणार आहेत. एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थी आणि पालकांना त्याची माहिती देण्यासाठी 7 एप्रिल रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावरकर मंडळातर्फे देण्यात आली.

निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात 7 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत हा मेळावा होणार आहे. ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आणि ब्रिगेडियर (निवृत्त) बलजीतसिंग गिल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सावरकर मंडळाच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत एनडीए प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीचा 22 एप्रिल ते 2 जून 2019 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे. सावरकर मंडळ यांचा एनडीए आणि एसएसबीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो. एनडीए तसेच सैन्य दलातील करिअरच्या संधी, त्याच्या प्रवेश प्रक्रिया व स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षण सावरकर मंडळामार्फत घेतले जाते.

या प्रशिक्षण वर्गासाठी एनडीएच्या नियमानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांचा वयोगट हा 16 ते 19.5 वर्षे असा आहे. म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी तसेच इयत्ता 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी देखील या प्रशिक्षण वर्गासाठी पत्र ठरू शकतात. एनडीए' प्रवेश परीक्षा प्रशिक्षण वर्गासाठी मर्यादित जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. या वर्गासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत आहेत. शहराच्या बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येऊ शकते.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा वा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते. या केंद्राअंतर्गत 'एनडीए' प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके देखील मंडळाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तसेच नव्याने सुरु झालेल्या अभ्यासिकेत देखील विद्यार्थी याचा अभ्यास करू शकतात. या माध्यमातून शहरी वा ग्रामीण भागातील गरजू व पात्र विद्यार्थ्यांना सहज व कमी खर्चात मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळातर्फे केला जातो.
मंडळातर्फे मागील दोन वर्षी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गातून दोन विद्यार्थी NDA व TES मध्ये निवडण्यात आले आहेत. तसेच या वर्गात प्रशिक्षण घेतलेले 10 विद्यार्थी 'एनडीए'ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 7 एप्रिल रोजीच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तसेच प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी 9325097416 / 9270031471 मोबाईलवर अथवा 020-27659010 या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी चार ते सायंकाळी साडेसात या वेळेत संपर्क साधावा.
एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीसाठी 7 एप्रिल रोजी मेळावा एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीसाठी 7 एप्रिल रोजी मेळावा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 30, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.