Seo Services
Seo Services

मावळ लोकसभा मतदार संघ उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर


           
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ  लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 15एप्रिल, 20 एप्रिल  आणि 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे दरम्‍यान मावळ लोकसभा मतदार संघ, पुणे यांचे कार्यालय, सहावा मजला, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी, पुणे येथे निवडणूक खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघ उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर मावळ  लोकसभा मतदार संघ  उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.