Seo Services
Seo Services

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनीही बजावला मतदानाचा हक्क


मुंबई : राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्नीसह चर्चगेट येथील के.सी. कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी श्री.शिंदे यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. तेथील केंद्र प्रमुख व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कुटुंबासह, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार यांनी पत्नी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी के.सी. कॉलेजच्या मतदान केंद्रावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोकण विभागाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी मुलासोबत रिगल सिनेमाजवळील सेंट ॲनिस गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनीही बजावला मतदानाचा हक्क अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनीही बजावला मतदानाचा हक्क Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 29, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.