कोलंबो : श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सरकारने चेहरे झाकणारे सर्व पेहराव, कपडे आणि मास्कवर बंदी घातली आहे. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लोकांची ओळख पटवण्यात अडचण निर्माण होणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. हे लोक राष्ट्रीय किंवा सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरु शकतात.
हा आदेशाची 29 एप्रिलपासून तातडीने लागू होत आहे. लागू झालेल्या या बंदीमध्ये मुस्लीम महिला परिधान करत असलेल्या नकाब किंवा बुरख्याचा उल्लेख नाही. पण सरकारच्या या निर्णयाचा परिणाम बुरखा आणि नकाब परिधान करणाऱ्या महिलांवरही होणार आहे. श्रीलंकेत ईस्टर सण्डेला चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटात 500 नागरिक जखमी झाले होते. काही दिवसांनी दहशतवादी संघटना आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेचा मोठा निर्णय; चेहरा झाकणाऱ्या सर्व कपड्यांवर बंदी....
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 29, 2019
Rating:

No comments: