पुणे : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील रिजनल आऊटरिच ब्यूरो व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हांधिकारी कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी मतदारांमध्येक जनजागृती करण्या साठी स्वीरप उपक्रमाद्वारे पुणे शहरात मतदार महाजनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे फिरते वाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
दिनांक ३ ते ९ एप्रिल,2019 दरम्यान आयोजित या अभियानात फिरते वाहन व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नवी दिल्ली येथील ब्यूरो ऑफ आऊटरिच कम्युनिकेशनचे महासंचालक श्री.सत्येंद्र प्रकाश, जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथे दिनांक 3 एप्रिल,2019 रोजी सकाळी 10-30 वाजता होणार आहे. यावेळी रिजनल आऊटरिच ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी आपण उपस्थित रहावे किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही विनंती.
मतदार महाजनजागृती अभियानाचे आयोजन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 02, 2019
Rating:

No comments: