पुणे : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 21 मे 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 नुसार अधिकार प्रदान केले आहे.
या अधिकारान्वये रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या,कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणेचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्णकर्कश वाद्ये वाजविणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होवू नये म्हणुन ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35,37 ते 40,42,43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे असे अधिकार प्रदान केले आहेत.
हे आदेश दिनांक 21 मे, 2019 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ठाणे अंमलदारांना कलम 36 नुसार अधिकार प्रदान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: