नवी दिल्ली : 'ई.व्ही.एम.' संदर्भात विरोधीपक्षांनी मे.सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये ५० टक्के व्हि.व्हि.पॅट. मशीन आणि ई.व्ही.एम. मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
मे.सुप्रीम कोर्टाने विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. ई.व्ही.एम. मध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होत असून ५० टक्के व्ही.व्ही.पॅट. मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.
पण, मे.सुप्रीम कोर्टाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास मे.सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे.
विरोधकांची ई.व्ही.एम. पुनर्विचार याचिका मे.सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली....
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: