यवतमाळ : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले तरोडा (ता.आर्णि) येथील पोलिस शिपाई अग्रमन बक्षी रहाटे यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गडचिरोली येथून त्यांचे पार्थिव उशिरा रात्री तरोडा येथे आणण्यात आले. सकाळी १० वाजता येथील जिल्हा परिषद शाळेसमोर शहीद अग्रमन रहाटे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आली. तत्पूर्वी पोलीस विभागाच्या वतीने त्यांना मानवंदना व हवेत बंदुकीच्या फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवाडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी शहीद रहाटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अंतिम दर्शन घेतले.
तत्पूर्वी शहीद जवान अग्रमन रहाटे यांची अंतिम यात्रा मांगूळ व तरोडा गावातून नेण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक अंतिम यात्रेत सहभागी झाले. यावेळी ‘शहीद अग्रमन रहाटे अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या.
जिल्हा पोलिस दलाच्या जलद कृती पथकात पोलिस शिपाई असलेले अग्रमन रहाटे हे महाराष्ट्र दिनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. १ फेब्रुवारी २०११ रोजी ते पोलिस दलात भरती झाले होते.

शहीद जवान अग्रमन रहाटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 03, 2019
Rating:
No comments: